प्रतिनिधी/ रत्नागिरी
मानवी तस्करीच्या माध्यमातून होणारे अवैध व्यवसाय रोखण्यासाठी रत्नागिरी पोलिसांची नवीन शाखा गठीत करण्यात येणार आह़े राज्य सरकारच्या गृहविभागाकडून नुकताच यासंदर्भात हिरवा कंदील देण्यात आला आह़े जिह्यामध्ये काही ठिकाणी छुप्या पद्धतीने महिलांकडून वेश्याव्यवसाय करण्यात येत असल्याचे समोर आले आह़े पोलिसांच्या या शाखेमुळे अशा गैरप्रकारांना आळा बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आह़े
लहान मुले व महिलांचा मानवी तस्करीसाठी मोठय़ा प्रमाणावर वापर करण्यात येत़ो खास करून महिलांना नोकरी, पैशाचे आमिष दाखवून मोठय़ा शहरात नेले जात़े तेथे त्यांना मारहाण करून वेश्याव्यवसायात ओढण्यात येत़े अनेक समाजसेवी संस्था, पोलिसांच्या मदतीने जबरदस्तीने या व्यवसायात ओढल्या गेलेल्या महिलांची सोडवणूक करण्यात आली आह़े मात्र मानवी तस्करी रोखण्यात अद्याप पोलिसांना यश आलेले नाह़ी
राज्यामध्ये 24 नवीन मानवी तस्करीविरोधी शाखा तयार करण्यात येणार आहेत़ सध्या मुंबई, पुणे शहर, ठाणे शहर, नागपूर, ठाणे ग्रामीण, सांगली, नवी मुंबई, सोलापूर, कोल्हापूर, अहमदनगर, बीड, यवतमाळ या ठिकाणी मानवी तस्करीविरोधी शाखा कार्यरत होत्य़ा यामध्ये आता नवीन 24 शाखांची निर्मिती करण्यात येणार आह़े यामध्ये 275 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत़ त्यात 9 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 21 उपविभागीय अधिकारी, 11 पोलीस निरीक्षक व 81 महिला पोलीस कर्मचारी असणार आहेत़
नव्याने मंजुरी मिळालेल्या शाखांमध्ये औरंगाबाद शहर, नाशिक शहर, पुणे ग्रामीण, चंद्रपूर, जळगाव, नांदेड, अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, जालना, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, सातारा, वर्धा, गडचिरोली, गोंदीया, धुळे, नंदुरबार, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर आदींचा समावेश असणार आह़े









