चीनमध्ये धुके, प्रदूषणाची समस्या
माद्रित :
युरोपीय देश असलेल्या जर्मनी, ऑस्ट्रिया, स्पेन आणि स्वीत्झर्लंडमध्ये जोरदार हिमवृष्टी होत आहे. तेथील तापमानाचा पारा आता उणे 8 अंश सेल्सिअसपर्यंत खालावला आहे. तापमानात मोठी घट झाल्याने सार्वजनिक वाहतूक सेवा ठप्प पडली आहे. फ्रान्समध्ये बहुतांश मार्ग बंद करण्यात आले असून बर्फ हटविण्याचे काम सुरू आहे. तर ऑस्ट्रियात लोकल रेल्वेसेवा प्रभावित झाली आहे. तेथील रेल्वेमार्गांवर 6 इंचापर्यंत बर्फ जमा झाला आहे. चीनमध्ये हुबेई प्रांतातील जियांगयांग शहर धुके आणि प्रदूषणामुळे जमिनीपासून आकाशापर्यंत झाकोळले गेले आहे. आकाशातून केवळ उंच इमारतीच दिसून येत आहेत. 56 लाख लोकसंख्या असलेल्या जियांगयांग शहरात दोन वर्षांमध्ये अत्यंत वेगाने निर्मितीकार्ये सुरू आहेत.
अनेक सरकारी प्रकल्प सुरू असल्याने प्रदूषणाची पातळी मोठय़ा प्रमाणावर वाढली आहे. शहरात आतापर्यंत इतके धुके कधीच पाहिले नव्हते असे नागरिकांचे म्हणणे आहे.









