खोची/वार्ताहर
माझ्या आमदार होण्यात खोची गावचे योगदान मोठे आहे. त्यामुळे खोचीसह परिसराचा सर्वांगीण विकास हा माझा ध्यास आहे. म्हणून खोचीसाठी तीन कोटी ११ लाख रुपये निधीची विविध फंडातून तरतूद केली असल्याचे प्रतिपादन हातकणंगलेचे आमदार राजूबाबा आवळे यांनी केले. यावेळी त्यांनी नागरिकांनी माझ्या पाठीशी नेहमी असेच उभे रहावे असे देखील आवाहन केले.
ते खोची ता.हातकणंगले येथे त्यांच्या विकास निधीतून विविध विकास कामाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी भैरवनाथ पोवार, एम.के.चव्हाण, सुशेनराव शिंदे-सरकार, शिवाजी पाटील, डॉ.अनिल पाटील, अमरसिंह पाटील, महावीर मडके, शंकर जाभंळे, हणमंत पाटील प्रमुख उपस्थित होते.
स्थानिक मान्यवरांच्या हस्ते दसरा चौक ते गणेश मंदिर डांबरीकरण करणे, मडके गल्ली, कागवाडे-पुनाळे गल्ली पेंव्हीग ब्लॉक बसविणे, चिखलगोंड रस्ता मुरमीकरण करणे ह्या पंचवीस लाख रुपये कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी गणेश मंदिर ते भैरवनाथ मंदिरापर्यंत रस्ता करणे पंधरा लाख रुपये, खोची-शरद कारखाना या रस्त्यासाठी पंतप्रधान सडक योजनेतून २६ लाख रुपये,पेठवडगाव ते खोची बंधाऱ्यापर्यत रस्ता डागडुजीसाठी ५० लाख रूपये,तसेच नाबार्ड मधून पेठ वडगाव- खोची या नव्याने झालेल्या राज्य मार्गासाठी दोन कोटी रुपये मंजूर केले असून हि कामे लवकरच सुरू होणार आहेत.असे आमदार राजूबाबा आवळे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी आमदार राजूबाबा आवळे यांना गावात हायमास्ट दिवे बसवणे व अन्य कामासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, यासाठी निवेदन देण्यात आले. यावेळी ग्रामविकास अधिकारी आर. एस. मगदूम, हणमंत पाटील, बाळासो पाटील, भूपाल लाटवडे, सुनिल पाटील, रावसाहेब मडके, विजय मडके, मोहन चव्हाण, वसंत कागवाडे, धनाजी पोवार आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.









