पोलीस वनविभागाची गुगवाड क्रॉसवर कारवाई
प्रतिनिधी/ बेळगाव
बाळीगेरी (ता. अथणी) जवळील गुगवाड क्रॉसनजीक घुबडाची तस्करी करणाऱया जत तालुक्मयातील दोघा जणांना अटक करण्यात आली आहे. पोलीस वनविभागाच्या पथकाने गुरुवारी ही कारवाई केली असून त्यांच्याजवळून 1 किलो वाजनाचा घुबड जप्त करण्यात आला आहे.
ज्ञानेश्वर शिवाजी जावेर (वय 39), भैरवनाथ मारुती मजलदार (वय 23, दोघेही रा. बिळ्ळूर, ता. जत, जि. सांगली) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा जणांची नावे आहेत. पोलीस वनविभागाच्या उपनिरीक्षक रोहिणी पाटील व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे. या कारवाईत हवालदार एस. आर. अरीबेंची, के. डी. हिरेमठ, बी. बी. इंगळगी आदींचा समावेश आहे.
विक्रीसाठी घुबडाची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळताच गुगवाड क्रॉसवर सापळा रचून अधिकाऱयांनी दोघा जणांना ताब्यात घेतले. एका प्लास्टिकच्या पिशवीत घुबड नेण्यात येत होता. पंचांसमक्ष घुबड जप्त करून या जोडगोळीला अटक करण्यात आली. त्यांना अथणी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे..









