22 हजार 810 कोटी रुपयांची तरतूद
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. केंद्रीय श्रम मंत्री संतोष गंगवार यांनी याबाबतची माहिती दिली. या नव्या आत्मनिर्भर भारत योजनेसाठी सरकारने 22,810 कोटी रुपयांची तरतूद केल्याचेही त्यांनी सांगितले.
आत्मनिर्भर भारत योजना 1 ऑक्टोबर 2020 पासून लागू होणार आहे. सरकार या योजनेवर 22,810 कोटी रुपये खर्च करणार आहे. यावषी त्यापैकी 1,584 कोटी रुपये खर्च करण्यात येतील. या योजनेचा 58.5 लाख कर्मचाऱयांना फायदा होणार असल्याचे मंत्रिमंडळ बैठकीनंतर स्पष्ट करण्यात आले.
डिजिटल क्रांतीला प्रोत्साहन
केंद्रीय मंत्रिमंडळाने देशात विविध ठिकाणी डेटा केंद्रांची स्थापना करण्यास मंजुरी दिली आहे. तसेच डिजिटल क्रांतीला प्रोत्साहन देण्यासाठी येणाऱया काळात प्रयत्न होणार आहेत.









