प्रतिनिधी / सोलापूर
शहरातील भारतीय जनता पार्टी कार्यालसमोर एका सर्वसामान्य शेतकऱ्याने केंद्र सरकारचा पुतळा जाळून निषेध केला.यामुळे भाजप कार्यालयात काही वेळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.याबाबत पोलिसांना माहिती मिळताच मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी आला.
एका सर्वसामान्य शेतकऱ्याने केला निषेध-कोणत्याही पक्षाला सोबत ना घेता चार मित्रांना घेत एका युवा शेतकऱ्याने भारतीय जनता पार्टीच्या सोलापूर मुख्य कार्यलसमोर केंद्र सरकारचा पुतळा पेटवून निषेध व्यक्त केला.
गनिमी कावा पद्धतीने पुतळा पेटवल्याने भाजपा कार्यालयात तणाव-
कुणालाही याची खबर न देता ,गनिमी कावा पद्धतीने चार शेतकऱ्यांनी एकत्र येत ,सिव्हील हॉस्पिटल मागे असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या मुख्य कार्यालया समोर केंद्र सरकारचा पुतळा पेटवल्याने तणाव निर्माण झाला होता .