प्रतिनिधी / कसबा बीड
कृषी कायद्याच्या विरोधात सर्वपक्षीय पुकारलेल्या भारत बंदला करवीर तालुक्यातील पश्चिम भागातील सर्वच गावातून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला. कोगे, महे सावरवाडी शिरोली दुमाला आदी गावातील सर्व व्यापाऱ्यांनी आपले उद्योगधंदे बंद ठेवून प्रतिसाद दिला. या आंदोलनाची सुरुवात बीड शेड येथे रास्ता रोको करून मान्यवरांच्या मनोगतानी सुरुवात झाली. यावेळी पंचायत समिती सदस्य राजेंद्र सूर्यवंशी, यशवंत बँकेचे अध्यक्ष एकनाथ पाटील, महे येथील हनुमान दूध संस्थेचे चेअरमन बुद्धीराज पाटील, दिनकरराव सूर्यवंशी आदींचे मनोगत झाले.
सकाळपासून दुपारपर्यंत व्यवहार बंद होते. आंदोलनामध्ये अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सर्वत्र बंद असल्याने रस्त्यावर वाहनांची गर्दी कमी प्रमाणात दिसून येत होती. या आंदोलनात पंचायत समिती सदस्य राजेंद्र सूर्यवंशी, दिनकरराव सूर्यवंशी, यशवंत बँकेचे चेअरमन एकनाथ पाटील, संचालक उत्तम पाटील (कोगे) ,सुभाष पाटील (वाकरे), महे गावचे हनुमान दूध संस्थेचे चेअरमन बुद्धीराज पाटील, महे ग्रामपंचायत उपसरपंच निवासराव पाटील, बाजीराव देवर्डे, कुंडलिक पाटील, आदी मान्यवर ,भागातील शेतकरी व युवा वर्ग उपस्थित होता.