- रिलायन्स जिओचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांची घोषणा
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशभरातील इंटरनेट युजर्ससाठी आनंदाची बातमी आहे. भारतात 2021 च्या उत्तरार्धात 5G सेवा लॉन्च करण्याच्या तयारीत असल्याची माहिती रिलायन्स जिओचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी मंगळवारी दिली.
ते म्हणाले, 2021मध्ये जिओ भारतात 5G लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. ही 5G सर्विस पूर्णतः स्वदेशी असणार आहे. याव्यतिरिक्त हार्डवेअर आणि टेक्नॉलॉजीही स्वदेशी असणार आहे. जिओमार्फत आम्ही आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करणार आहोत.
- अजूनही 30 कोटी 2G चे युजर्स
देशात अजूनही 30 कोटी 2G फोन चे युजर्स आहेत. या लोकांपर्यंत स्मार्टफोन अद्याप पोहोचलेला नाही आणि त्यासाठी त्यांनी धोरणांमध्ये हस्तक्षेप करण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. पुढे ते म्हणाले की, आम्ही डिजिटल पद्धतीने खूप चांगले कनेक्ट झालो आहोत.
तसेच भारताला 5G स्पेक्ट्रमबाबत लवकरात लवकर निर्णय घेणे आवश्यक आहे. त्याचसोबत त्यांनी हे देखील सांगितले की, जियो 5G नेटवर्क सेवेचे नेतृत्त्व करणार आहे. भारतात येणाऱ्या काही दिवसांत सेमी कन्डक्टरचे मॅन्युफॅक्चरिंग केंद्र बनू शकते. आम्ही सेमी कन्डक्टरसाठी केवळ बाहेरील देशांच्या मदतीवर अवलंबून राहू शकत नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.