प्रतिनिधी/ रहिमतपूर
कृषी कायद्याविरोधात दिल्लीत आंदोलन करत असलेल्या शेतकरी संघटनांनी भारत बंदची हाक दिली आहे. सर्वांच्या हितासाठी रहिमतपूर येथील शेतकरी स्वयंस्फूर्तीने बंद पाळतील. या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीर पाठींबा असल्याचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी स्पष्ट केले.
कृषी विधेयक 2020 रद्द करावे किंवा नव्याने कायदा करून हमीभाव लागू करावा, अशी मागणी करत शेतकरी संघटनांनी दिल्ली येथे आंदोलन सुरू केले आहे. शेतकरी संघटनांनी देशभरातील शेतकर्यांना आठ डिसेंबरला भारत बंद ठेवण्याचे आवाहन केले. त्यांच्या आवाहनाला देशभरातून पाठिंबा मिळत आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत रहिमतपूर बंद ठेवण्याचा निर्णय स्वयंस्फूर्तीने शेतकरी घेतील. रहिमतपूरचे नव्हे तर जिह्यातील शेतकर्यांसह नागरिकांनी या बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन सुनील माने यांनी केले.