मुरूमं, पुटकुळ्यांमुळे चेहर्याचं सौंदर्य पूर्णपणे लोप पावतं. ही समस्या दूर करण्यासाठी डाळिंबापासून तयार केलेले फेसपॅक वापरता येतील. या पॅक्समुळे मृत त्वचाही निघून जाईल. शिवाय रोमछिद्रांमध्ये साचलेली घाणही स्वच्छ होईल. हे फेसपॅक्स वेगवेगळ्या तीन पद्धतींनी बनवता येतील.
* मुरूमांपासून मुक्तता मिळवायची असेल तर डाळिंबाचा रस आणि दही घालून पॅक तयार करा. यामुळे त्वचा ताजीतवानी आणि टवटवीत दिसेल. हा पॅक लावल्यानंतर साधारण 20 मिनिटांनी धुवून टाका. हा उपाय वरचेवरही करता येईल.
* फेस पॅक तयार करण्यासाठी अननसाची सालही वापरता येईल. सर्वात प्रथम अननसाची साल काढून घ्या. ती पाण्यात उकळून घ्या. गाळून घ्या. उकडलेली साल मिक्सरमध्ये वाटून घ्या. या मिश्रणात गुलाब पाणी घाला. हे मिश्रण चेहर्याला दहा मिनिटं लावून ठेवा. थंड पाण्याने धुवून टाका. हा मास्क लावून वाफही घेता येईल.
* तेलकट त्वचा असणार्यानी डाळिंब आणि लिंबाचा रस लावायला हरकत नाही. तेलकट त्वचेवर सतत मुरूमं येत असतात. लिंबू आणि डाळिंबाच्या रस सम प्रमाणात घ्या. हे मिश्रण चेहर्याला लावून 15 ते 20 मिनिटं ठेवा. थंड पाण्याने धुवून टाका.









