शिरोळ / प्रतिनिधी
बनावट नोटा प्रकरणी सातारा येथील संशयित महिलेकडून 83 हजार रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदर महिलेस न्यायालयात उभे केले असता आठ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली असल्याची माहिती शिरोळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवानंद कुंभार यांनी दिली
5 डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास संशयित महिला आरोपी विद्या राहुल कदम वय वर्षे 35 राहणार आयोध्या नगरी सातारा जिल्हा सातारा ही श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील विजय कालिदास शिरसाट यांच्या पेढ्याच्या दुकानातून पाण्याची बॉटल व पेढे घेण्याच्या बहाण्याने 50 रुपयांच्या दोन नोटा दिल्या शिरसाट यांच्या या दोन्ही नोटा बनावट असल्याचे लक्षात आले त्यांनी तातडीने पोलिसात फिर्याद दिली
पोलीसांनी संशयित आरोपी विद्या कदम हिच्याकडे अधिक चौकशी केली असता तिने आपले राहण्याचे ठिकाण कोल्हापूर असल्याचे सांगितले पोलिसांना संशय आल्याने त्यांनी सदर महिलेस अधिक विश्वासात घेऊन राहण्याच्या पत्ता याबाबत विचारणा केली असता तिने आयोध्या नगरी राधिका रोड सातारा जिल्हा सातारा येथे राहणार असल्याचे सांगितले
सदर महिलेकडून 30 हजार 950 रुपये किमतीचे 50 रुपयांच्या एकूण 619 बनावट नोटा बनवण्यासाठी वापरले लॅपटॉप, कलर प्रिंटर ,पेपर कटिंग मशीन, पेपर रिम ,मोबाईल असा एकूण 83 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
संशयित आरोपी विद्या कदम ही उच्चशिक्षित असून ती सातवी ते दहावी विद्यार्थ्यांसाठी क्लास घेत होती. गेल्या आठ नऊ महिन्यापासून बनावट चलनी नोटा राहत्या घरी तयार करीत असे. मोबाईल मध्ये 50 रुपयांच्या नोटा स्कॅन करून लॅपटॉप व कलर प्रिंटच्या आधारे नोटा तयार करून किरकोळ साहित्य खरेदी करणे करिता सदर नोटांचा वापर करीत होती. कोरोनामुळे कडक लॉकडाऊन झाल्यामुळे या बनावट नोटा खपविण्यासाठी अडचणी आल्या, असे तिने सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सदर महिलेवर सातारा येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात गुन्हा दाखल असल्याचे शिवानंद कुंभार यांनी सांगितले