रविवारी नव्याने 15 रूग्ण, 7 रूग्णांना डिस्चार्ज
प्रतिनिधी / रत्नागिरी
जिह्यातील कोरोना रूग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून वाढताना दिसून येत होत़े परिणामी कोरोनामुळे होणारे मृत्यूच्या घटनाही समोर येत आहेत़ रविवारी रत्नागिरी तालुक्यातील 53 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. जिह्यामध्ये मागील 24 तासात कोरोनाचे 15 रूग्ण आढळून आले तर 7 रूग्ण हे कोरोनामुक्त होवून घरी परतल़े
रविवारी जिल्हा शासकीय रूग्णालयाकडून करण्यात आलेल्या कोरोनाच्या 137 चाचण्यांपैकी आरटीपीसीआर टेस्टमध्ये 8 तर ऍन्टीजेन टेस्टमध्ये 7 कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत़ यातील दापोली 1, खेड 1, गुहागर 3, संगमेश्वर 4, लांजा 2, राजापूर 4 रूग्ण आढळून आले आहेत़ जिह्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 8 हजार 901 इतकी झाली आह़े तर कोरोनापासून बरे झालेल्या 7 रूग्णांना घरी सोडण्यात आल़े यामुळे कोरोनापासून बरे झालेल्या रूग्णांची संख्या 8 हजार 367वर पोहोचली आह़े जिह्यातील बरे होण्याचे प्रमाण 94.00 इतके आह़े
मृतांच्या तालुकानिहाय आकडेवारीचा विचार करता रत्नागिरी सर्वाधिक 89, खेड 51, गुहागर 12, दापोली 33, चिपळूण 76, संगमेश्वर 33, लांजा 11, राजापूर 14 तर मंडणगडमध्ये 3 अशा एकूण 322 जणांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आह़े कोरोनासंबंधित कोणतीही लक्षणे असल्यास वेळेत तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाकडून करण्यात आले आह़े
जिल्हय़ातील कोरोनाची स्थितीः
एकूण रूग्ण-8901
नवे रूग्ण -15
नवे मृत्यू -01
एकूण मृत्यू -322









