ऑनलाईन टीम / लंडन :
ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय आणि त्यांचे पती प्रिन्स फिलीप यांना फायझर-बायोएनटेकच्या कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस देण्यात येणार आहे. ब्रिटनचे आरोग्य मंत्री मॅट हॅनकॉक यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
ब्रिटनमध्ये मंगळवार पासून पहिल्या टप्प्याच्या लसीकरणाची सुरवात केली जात आहे. बेल्जियम मधून फायझर- बायोएनटेकच्या लसीचे डोस आणून लसीकरण केंद्रांवर पोहचवण्यात आले आहेत. सध्या 50 ठिकाणी ब्रिटनच्या राष्ट्रीय आरोग्य सेवा रुग्णालयात लसीकरण करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
सुरुवातीच्या टप्प्यात डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, स्थानिक प्रशासकीय कर्मचारी आणि 80 वर्षावरील व्यक्तींना ही लस देण्यात येणार आहे. नागरिकांना लसीबाबत भीती राहू नये, म्हणून 94 वर्षीय महाराणी एलिझाबेथ आणि तिचे 99 वर्षाचे पती प्रिन्स फिलीप यांनाही लस दिली जाणार आहे.









