प्रतिनिधी / संगमेश्वर
मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वर रेल्वेस्टेशन जवळ रात्री 7.30 वाजण्याच्या दरम्याने ट्रक आणि कॉलीसमध्ये भीषण अपघात घडला असून दोघेजण जागीच ठार आणि 1 जण गंभीर जखमी झाला आहे.
कॉलीस गाडिचा चालक आतमध्ये अडकून पडला असून त्याला बाहेर काढण्यात आले, मात्र तो जागीच मृत्यू झाला तर महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचार सूरु आहेत.
पोलीस घटनास्थळी दाखल। झाले असून मृत्यू ओळख पटविणे आणि पंचनाम्याचे काम सुरू आहे.









