नवी दिल्ली
शाओमीने भारतीय बाजारात आपला एमआय टीव्ही-5 सादर करण्याची तयारी चालवली आहे. कंपनीच्या नवीन टीजरवर सदर आवृत्तीमध्ये एमआर टीव्ही-5 आणि एमआय टीव्ही-5 प्रो या मॉडेलचा समावेश होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शाओमीने सोशल मीडियावर यांच्या टीजरमध्ये क्वांटम लीप्स अहेड शब्दाचा वापर केला आहे. याचा अर्थ एम टीव्ही-5 प्रो मध्ये अल्ट्रा-एचडी क्वांटम डॉट एलईडी स्क्रीनची सुविधा मिळणार असल्याची माहिती आहे. प्रामुख्याने 55 इंच, 65 आणि 75 इंच या आकारामध्ये टीव्ही उपलध होणार असल्याचे शाओमीने स्पष्ट केले आहे. चीनच्या बाजारात एमआय टीव्ही-5 ची किमत जवळपास 33,800 रुपयांपासून पुढे तर एमआय टीव्ही-5 प्रो किमत 41,700 रुपये राहील.









