प्रतिनिधी / कोल्हापूर
सीपीआर हॉस्पिटलमध्ये नॉन कोरोना रूग्णांसाठी 50 टक्के बेड खुले झाले, सध्या कोरोना रूग्णांची संख्या घटली आहे. पण नॉन कोरोना रूग्णसंख्येत वाढ झाली आहे. शुक्रवारी सायंकाळी सीपीआरमध्ये आलेले 5 रूग्ण सेवा रूग्णालयात पाठवले. तेथे त्यांना सीपीआर हाऊसपुल्ल असल्याचे सांगण्यात आले. सेवा रूग्णालयात मर्यादित बेड असल्याने या रूग्णांची कोंडी झाली.
जिल्ह्यात 1 मार्चपासून सीपीआर हॉस्पिटल, आयजीएम इचलकरंजी आणि गडहिंग्लज उपजिल्हा रूग्णालय कोरोना आयसोलेटेड हॉस्पिटल झाली. 1 नोव्हेंबरपासून सीपीआर, आयजीएम हॉस्पिटल, गडहिंग्लज उपजिल्हा रूग्णालय 50 टक्के कोरोना रूग्णांसाठी खुले झाले. सीपीआर हॉस्पिटलमधील नॉन कोरोना रूग्णांवर कोरोना काळात लाईन बाजार येथील सेवा रूग्णालयात उपचार केले जात होते. तेथेच एमएलसी निगडीत रूग्णांची नोंदही सुरू होती. सीपीआर हॉस्पिटल नॉन कोरोना रूग्णांसाठी 50 टक्के खुले झाल्यानंतर सेवा रूग्णालयावरील ताण काही दिवस कमी झाला होता.
सीपीआर हॉस्पिटलमध्ये कोरोना रूग्णांसाठी 237 बेड तर नॉन कोरोना रूग्णांसाठी 227 बेड आहेत. नॉन कोरोना वॉर्डमध्ये 152 रूग्ण उपचार घेत आहेत. कोरोना वॉर्डमध्ये सध्या 75 रूग्ण उपचार घेत आहेत. येथे 160 बेड रिक्त आहेत. कोरोना रूग्णांची संख्या घटल्याने रिक्त बेडची संख्या वाढली आहे. शुक्रवारी सीपीआरमधील नॉन कोरोना आंतररूग्ण संख्या वाढली. त्यामुळे 227 पैकी 80 टक्के बेड फुल्ल झाले. त्यामुळे तातडीने येणाऱया रूग्णांना सेवा रूग्णालयाकडे पाठवण्यात आले.
सीपीआर हॉस्पिटलमध्ये पोलीस चौकी आहे. पण अद्यापी एमएलसीशी निगडीत बाहÎ रूग्ण सेवा रूग्णालयाकडे पाठवले जात आहेत. शुक्रवारी सायंकाळी असे 5 ते 6 रूग्ण सीपीआरमधून सेवा रूग्णालयात पाठवले गेले. तेथे त्यांना सीपीआर हॉस्पिटल हाऊसफुल्ल आहे, असें सांगण्यात आले. या रूग्णांवर सेवा रूग्णालयात उपचार शक्य नसल्याने पुन्हा ते सीपीआरला पाठवले गेले. नॉन कोरोना रूग्णांसाठी सीपीआर हाऊसफुल्ल झाल्याने सीपीआर नॉन कोरोना रूग्णांसाठी 75 टक्के खुले करावे, अशी मागणी वाढू लागली आहे.