दिवसभरात 10 जणांची कोरोनावर मात
प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून गुरुवारी करण्यात आलेल्या कोरोनाच्या 177 चाचण्यांपैकी 18 नवे रुग्ण आढळून आले आहेत़ 10 जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आल़े यामुळे जिह्यातील एकूण बाधितांची संख्या 8 हजार 850 इतकी झाली आह़े
जिह्यामध्ये गुरुवारी आरटीपीसीआर टेस्टमध्ये 5 तर ऍन्टिजेन टेस्टमध्ये 13 कोरोनाबाधित रूग्ण आढळून आल़े यामध्ये रत्नागिरी तालुक्यात 8, दापोली 1, खेड 2, लांजा 1, गुहागर 1 चिपळूण 1, संगमेश्वर 4 असे रुग्ण आढळून आले आहेत़ दिवसभरात बरे झालेल्या 10 जणांना घरी सोडण्यात आल़े कोरोनापासून बरे झालेल्यांची संख्या 8 हजार 323 वर पोहोचली आह़े जिह्यातील बरे होण्याचे प्रमाण 94.04 इतके आह़े
जिल्हय़ातील कोरोनाची स्थिती:
एकूण रुग्ण-8850
नवे रुग्ण -18
नवे मृत्यू -00एकूण मृत्यू -321









