प्रतिनिधी/ बेळगाव
संगमेश्वरनगर येथील एका युवकाचा गेल्या सव्वा महिन्यांपूर्वी फिल्मी स्टाईलने पाठलाग करून खून करण्यात आला होता. शिवबसवनगर परिसरातील एका घरात घुसून त्याचा खून करण्यात आला होता. या प्रकरणी माळमारुती पोलिसांनी गुरुवारी प्रमुख आरोपी लक्ष्मण दड्डीला अटक केली आहे.
26 ऑक्टोबर रोजी रात्री शहाबाज शेरखान पठाण (वय 24, रा. दुसरा क्रॉस, संगमेश्वरनगर) याचा थरारक पाठलाग करून खून करण्यात आला होता. माळमारुती पोलिसांनी बसवराज दड्डी (वय 26), बसवाणी नाईक (वय 28, दोघेही रा. मुत्यानट्टी) यांना त्याचवेळी अटक केली होती.
मुत्यानट्टी येथील लक्ष्मण दड्डी (वय 55) याला अटक करण्यात आली आहे. माळमारुतीचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे. शहाबाजच्या खुनानंतर लक्ष्मण फरारी झाला होता. पोलिसांनी त्याच्या मुसक्मया आवळल्या आहेत.









