प्रतिनिधी / खानापूर
शिवाजीनगर-खानापूर येथील सार्वजनिक श्री गणेश उत्सव मंडळाचे हे रौप्यमहोत्सव वर्ष आहे. याचे औचित्य साधून मंडळाच्या समुदाय भवन इमारतीवर स्लॅब घालण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या शिवाजी नगरवासियांच्या विशेष सर्वसाधारण सभेत सर्वानुमते घेतला. श्री गणेश मंडळाचे ज्येष्ठ सल्लागार कृष्णाजी पारिश्वाडकर अध्यक्षस्थानी होते.
मंडळाचे अध्यक्ष कै. शांताराम सुतार तसेच शिवाजीनगरचे नागरिक कै. जगन्नाथ महिलांदे, कै. सुधा श्रीकांत पाटील व हजरतबी हारुणसाब शेख यांना दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहिली. रौप्यमहोत्सवानिमित्त पंचवीस वर्षाचा आढावा घेऊन अहवाल तयार करणे, समुदायभवन इमारतीवर स्लॅब घालणे आदी वर्षभर विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे संस्थापक पदाधिकारी एस. जी. शिंदे यांनी दिली.
कृष्णाजी पारिश्वाडकर व एस. जी. शिंदे यांनी प्रत्येकी 51 हजार रुपये देणगी जाहीर केली. तुळसा झळके 10,001 रुपये, कमांडो ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट शिवाजीनगर 10,001 रु, म्हात्रू यल्लाप्पा नरसेवाडकर 5555, प्रल्हाद पाटील 1101, अनिष साबळे 1001, मारुती चव्हाण 1001, यल्लारी गुरव 1001, पुंडलिक पाटील 501, चंद्रकांत देसाई 501 रु. अशा रोख देणग्या दिल्या. 51 हजार देणाऱया भक्तांचा किंवा त्यांच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या स्मरणार्थ देणगी असेल तर त्या व्यक्तीचा फोटो समुदायभवन सभागृहात लावण्याचा निर्णय या सभेत घेतला.
11 हजारापेक्षा जास्त देणगी देणाऱया भक्तांच्या नावाना समुदायभवनच्या सभागृहात योग्य ते स्थान देण्यात येणार आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर या स्लॅबच्या कामासाठी कुणालाही देणगीची सक्ती केली जाणार नाही.
जे भक्त स्वच्छेने व स्वयंस्फूर्तीने देणग्या देतील, त्या देणग्या स्वीकारुन हे काम पूर्ण केले जाणार आहे. कामाचा जमा खर्च स्वतंत्र लिहून अहवाल प्रसिद्ध करणार आहोत, अशी माहितीही एस. जी. शिंदे यांनी दिली.









