प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण, नगरपालिका भागात आज बुधवारी 162 नवे कोरोनाबाधित पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून एकाच दिवशी 175 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. 162 पैकी 113 पुरुष, 49 स्त्रियांचा समावेश आहे. आज 4 तर आतापर्यंत 1045 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 35 हजार 740 कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 1 हजार 632 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव यांनी दिली.
जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने आज कोरोना बाधितांचा अहवाल दिला आहे. आज 2028 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील 1866 अहवाल निगेटिव्ह आले आहेत, तर 162 पॉझिटिव्ह आढळल्या आहे. आतापर्यंत 1045 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 33 हजार 063 जण बरे होऊन घरी गेली आहेत.
कोरोनाबाधितांची संख्या पुढील प्रमाणे
अक्कलकोट – 1161
मंगळवेढा- 1620
बार्शी – 6292
माढा- 3766
माळशिरस – 6501
मोहोळ- 1749
उत्तर सोलापूर – 787
करमाळा- 2216
सांगोला – 2773
पंढरपूर 7353
दक्षिण सोलापूर – 1521
एकूण – 35, 740
होम क्वांरटाईन – 11995
एकूण तपासणी व्यक्ती- 330540
प्राप्त अहवाल- 330491
प्रलंबित अहवाल- 49
एकूण निगेटिव्ह – 294752
कोरोनाबाधितांची संख्या- 35,740
रुग्णालयात दाखल – 1632
आतापर्यंत बरे – 33,063
मृत – 1045









