प्रतिनिधी/ बेळगाव
कर्नाटक राज्य माध्यमिक शिक्षक संघ बेळगाव जिल्हा आणि डाएट मण्णूर यांच्यावतीने मराठी माध्यम शिक्षकांसाठी पाच दिवसांचे संगणक प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे.
सरकारी माध्यमिक शिक्षकांना संगणकाचे प्रशिक्षण 2016 पासून टप्प्याटप्प्याने देण्यात येते. पण विनाअनुदानित शिक्षकांना आणि मराठी भाषेच्या शिक्षकांना या प्रशिक्षणापासून वंचित राहावे लागत होते. त्यासाठी कर्नाटक राज्य माध्यमिक शिक्षक संघ बेळगाव जिल्हा यांच्यावतीने अध्यक्ष एकनाथ पाटील यांनी डाएट प्राचार्य सिंदूर यांना विनंती केली आणि त्यांच्या विनंतीनुसार डाएटच्यावतीने मराठी माध्यमातील निवडक 20 शिक्षकांना पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. सदर प्रशिक्षण चिंतामणराव हायस्कूल शहापूर या ठिकाणी सुरू असून संपन्मूल व्यक्ती म्हणून एस. एन. मुजावर मार्गदर्शन करत आहेत.
सदर शिबिराचा उद्घाटन सोहळा सकाळी साडेदहा वाजता पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बेळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे कार्यदर्शी उमेश कुलकर्णी उपस्थित होते. प्रारंभी सी. वाय. पाटील यांनी स्वागत केले. उमेश कुलकर्णी यांनी सर्वांना यथोचित मार्गदर्शन केले. एस. एस. बराटे यांनी आभार मानले.









