वृत्तसंस्था/ मॉऊंट माँगेनुई
सध्या विंडीजचा क्रिकेट संघ न्यूझीलंडच्या दौऱयावर आला आहे. यजमान न्यूझीलंडने तीन सामन्यांची टी-20 मालिका 2-0 अशी एकतर्फी जिंकली. सोमवारी उभय संघातील तिसरा आणि शेवटचा सामना पावसामुळे वाया गेला.
या शेवटच्या सामन्यात केवळ 2.2 षटकांचा खेळ झाला. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून विंडीजला प्रथम फलंदाजी दिली आणि विंडीजने 2.2 षटकांत 1 बाद 25 धावा जमविल्या होत्या. यानंतर मुसळधार पावसाला प्रारंभ झाल्याने पंचांनी हा सामना रद्द केल्याची घोषणा केली.
या मालिकेतील पहिला सामना यजमान न्यूझीलंडने 5 गडय़ांनी जिंकला होता. त्यानंतर दुसऱया सामन्यात न्यूझीलंडने विंडीजवर 72 धावांनी विजय मिळविला होता. या मालिकेत न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाजने फर्ग्युसनला ‘मालिकावीर’ म्हणून घोषित करण्यात आले. फर्ग्युसनने या मालिकेतील पहिल्या सामन्यात 21 धावांत 5 गडी बाद केले होते. आता उभय संघातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला हॅमिल्टनमध्ये येत्या गुरूवारी प्रारंभ होत आहे.









