बेळगाव / प्रतिनिधी
जिल्हय़ात ‘लाळय़ा खुरकत’ प्रतिबंधक लसीकरण मोहिमेतील 76 टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित 24 टक्के जनावरांनाही प्रतिबंधक लस देण्याचे काम सुरू आहे. जिल्हय़ातील 13 लाख जनावरांपैकी 10 लाख जनावरांना लसीकरण करण्यात आले आहे. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात मोहिमेला सुरुवात झाली असून एकही जनावर लसीकरणापासून वंचित राहणार नाही, यासाठी खात्याचे प्रयत्न सुरू आहेत.
दरवषी राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत ही मोहीम दोन टप्प्यात राबविली जाते. मात्र यंदा कोरोनामुळे पहिल्या टप्प्यातील मोहिमेला स्थगिती मिळाली होती. आता दुसऱया टप्प्यातील मोहीम शेवटच्या टप्प्यात आहे. गाय, बैल आणि म्हैस या जनावरांसाठी ही लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.
जिल्हय़ातील 13 लाख 95 हजार पैकी बेळगाव तालुक्मयातील 1 लाख 26 हजार जनावारांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट खात्यासमोर होते. आतापर्यंत 10 लाख जनावरांना लसीकरण करण्यात आले आहे. या मोहिमेसाठी 106 पथकांची नेमणूक करण्यात आली असून त्यामध्ये पशुवैद्यकीय अधिकारी, पशुपरीक्षक, मैत्री कर्मचाऱयांचा समावेश आहे.
जिल्हय़ात 28,09,109 तर बेळगाव तालुक्मयात 1,78,075 इतकी जनावरांची संख्या आहे. शेतीला जोड व्यवसाय म्हणून ग्रामीण भागात पशुपालनाला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे ग्रामीण भागात जनावरांची संख्या अधिक आहे.
लाळय़ा खुरकतची लागण झाल्यास जनावर आजारी पडून दूध क्षमता कमी होते. रोग अतिप्रमाणात झाल्यास जनावर दगावण्याची शक्मयता असते. त्यामुळे ज्या पशुपालकांनी आपल्या जनावरांना लाळय़ा खुरकत प्रतिबंधक लसीकरण करून घेतलेले नाही त्यांनी तातडीने संबंधित पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधून लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन खात्याने केले आहे.
लाळय़ा खुरकत हा विषाणूजन्य रोग असून हा हवेमार्फत पसरत असतो. त्याची लागण झाल्यास जनावरांच्या जीभेला पुरळ उठतात व पायांना जखमा होऊन त्यात कीड निर्माण होते. तसेच ही लस टोचल्यानंतर दूध क्षमता कमी होते असा काही शेतकऱयांचा गैरसमज आहे. मात्र तसा कोणताही गैरसमज मनात न ठेवता सर्व पशुपालकांनी जनावरांना लसीकरण करून घ्यावे, असे खात्यामार्फत सांगण्यात येत आहे. प्रत्येक गावातील पशुपालकांच्या गोठय़ापर्यंत जाऊन जनावरांना लसीकरण करण्यात येत असून पशुवैद्यकीय अधिकाऱयांना कोरोनाचे नियम पाळून हे काम करावे लागत आहे.









