पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांची सूचना
प्रतिनिधी/बेळगाव
कोरोना काही प्रमाणात आटोक्मयात आला तरी त्याबाबत कोणीही बेजबाबदार वागू नका. कोरोनाबाबत अजूनही दक्षता घेणे गरजेचे आहे. सरकारने सर्व ती तरतूद केली आहे. त्यामुळे अधिकाऱयांनी त्याचा पुरेपूर उपयोग करून रुग्णांवर उपचार करून त्यांना बरे करावे, अशी सूचना पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी अधिकाऱयांना केली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना तसेच इतर समस्यांबाबत पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी अधिकाऱयांची बैठक घेतली. त्यामध्ये ही सूचना केली आहे. जिल्हय़ामध्ये एकूण 293 पोलीस अधिकारी व पोलिसांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यामधील 289 जण बरे झाले आहेत. मात्र चार जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा पोलीसप्रमुख, दोन डीवायएसपी, 3 सीपीआय, 5 पीएसआय, 40 एएसआय, 93 महिला आणि पोलीस हवालदार तसेच 449 कॉन्स्टेबल यांना कोरोनाची बाधा झाली होती, असा अहवाल आरोग्याधिकाऱयांनी दिला आहे.
सध्या कोरोनाबाबत जिल्हा प्रशासनाने चांगली कामगिरी केली आहे. यापुढेही अशाच प्रकारे खबरदारी घेऊन रुग्णांवर उपचार करावेत, अशी सूचना पालकमंत्र्यांनी केली आहे. या बैठकीला जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी, जिल्हा आरोग्याधिकारी शशिकांत मुन्याळ, महापालिका आयुक्त जगदीश के. एच., अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.









