प्रतिनिधी / सांगली
शिख समाज धर्मगुरु गुरुनानक यांचे 551 वे प्रकाश पर्व साजरे होत आहे. या निमित्त शहरातील टिंबर एरिया परिसरातील रुद्वाराम गेल्या १५ दिवसांपासून गुरुग्रंथसाहिब पठणाचे वाचन, तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तर सोमवार ३० नोव्हेंबर रोजी मुख्य जयंतीदिनी पठणाची सांगता व गुरुनानक यांना अभिवादन करण्यात आले.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदा सॅनिटायझर, मास्क, सोशल डिस्टन्स व शासनाच्या नियमानुसार ही जयंती साजरी करण्यात आली. सोमवार ३० नोव्हेंबर रोजी मुख्य जयंती दिनी सकाळ पासून दर्शन घेतले. गेल्या १६ तारखेपासून सुरू असलेल्या श्री गुरुग्रंथसाहेब यांचे पठणांची सांगता यावेळी करण्यात आली. यानिमित्ताने सकाळी गुरुवाणी, किर्तन, प्रार्थना, असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. तर दुपारी भाविकांना महाप्रसादाचेही वाटप करण्यात आले. या सर्व कार्यक्रमास शीखबांधवांसह शहर परिसरातील विविध समाजबांधवांनी उपस्थित राहून लाभ घेतला.
यावेळी समाजाचे अध्यक्ष श्रीभूपेंद्रसिंग जुनेजा, हारपारसिंग कटरिया, जगजितसिंग सेंमी, जसविंदरसिंग सेमी, दर्शनसिंग चढ्ढा, अमरजीतसिंग खंगूरा, हरजीनासिंग खंगूरा आदी उपस्थित होते.