संकेतस्थळाचे लोकार्पण, नवीन लोगोसाठी स्पर्धेचे आयोजन
प्रतिनिधी/ फोंडा
राजीव गांधी कला मंदिरतर्फे घेण्यात येणारे उपक्रम सर्वापर्यंत पोचावे, गोव्याची लोककला सातासमुद्रापार वास्तव्य करणाऱया प्रत्येक गोयकारांकडे पोचावी या एकमेव उद्देशाने राजीव गांधी कला मंदिरतर्फे नुकतेच www.rgkmgoa.comसंपेतस्थळाचे (वेबसाईटस्चे) लोकार्पण कला व संस्कृती मंत्री तथा राजीव कला मंदिरचे अध्यक्ष गोविंद गावडे यांच्याहस्ते करण्यात आले. ऐरना थिएटर येथे झालेल्या या सोहळय़ात मंत्री गावडे यांच्याहस्ते लॅपटॉवर कळ दाबून संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले.
सध्याच्या डिजीटल युगात कला मंदिरतर्फे एक पाऊल पुढे टाकून वेब युगात पर्दापण करण्यात आले आहे. गेली कित्येक वर्षे कला मंदिरतर्फे कला, साहित्य, लोककला कार्यक्रमात अग्रेसर आहेत. या सोहळयाला सदस्य सचिव अलेक्स वाझ, किरण नाईक, महादेव प्रभू, नारायण नाईक, शैलेश बोरकर उपस्थित होते. संचालक मंडळाच्या बैठकीत राजीव कला मंदिरचा लोगो बदलण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानुसार राष्ट्रीय पातळीवर ‘गोयची संस्कृती’ या थिमवर कला मंदिरचा नवीन लोगो बनविण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली असून अर्ज 9 डिसें. रोजी सायं. 4 वा. पर्यंत rjkmgoa@gmail.com या संकेतस्थळावर पाठवावेत असे आवाहन कला मंदिरतर्फे करण्यात आले आहे. स्पर्धेचा निकाल 11 रोजी जाहीर करण्यात येणार असून लोगोसाठी निवडलेल्या कलाकाराला रू. 25 हजाराचे पारितोषिक प्रदान करण्यात येईल. यापुढे कला मंदिरच्या सर्व पत्रव्यवहार व प्रशस्तीपत्रकात या नवीन लोगोचा समावेश करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री गावडे यांनी दिली.









