ऑनलाईन टीम / बोगोटा :
कोलंबियात 13 लाख 08 हजार 376 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 12 लाख 04 हजार 452 रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
रविवारी या देशात 8 हजार 763 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर 183 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 67 हजार 340 रुग्णांवर उपचार सुरू असून, 2376 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. तर 36 हजार 584 जणांचा मृत्यू झाला आहे.
कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत कोलंबियाचा जगात दहावा क्रमांक लागतो. येथे आतापर्यंत 63 लाख 92 हजार 655 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.









