सातारा / प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून भाजपचे नेते मराठा आरक्षणा संदर्भात उलटसुलट भाष्य करत आहेत. त्या पाठीमागचा युक्तिवाद कायद्याच्या पातळीवर कमी आणि राजकीय सत्तेसाठी जास्त प्रमाणात होत आहे. राज्याच्या सत्तेतून भाजपचा पाय उतार होणे आणि मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टात स्थगिती मिळणे याचा निकटचा संबंध आहे. असे भाजपच्या माजी मुख्यमंत्री, मंत्र्यांना वाटत आहे, अशा शब्दांत आमदार शशिकांत शिंदे यांनी भाजपवर निशाणा साधला. तसेच खासदार उदयनराजे यांनी पत्रकार परिषदेत केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिले.
खासदार उदयनराजे यांना ही असेच वाटते की देवेंद्र फडणवीस यांना सत्ता द्या, मी मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवतो, असे ते म्हणत आहेत.वस्तुतः राज्यात कोणाची सत्ता आहे यावर जर सुप्रीम कोर्टात निर्णय होणार असतील तर मराठा आरक्षणाचा प्रश्न राजकीय वळणाने गेला आहे असे दिसते. भाजप व त्यांच्या नेत्यांना खरच आरक्षण द्यायचे असते तर केंद्र सरकारने या याचिकेत हस्तक्षेप करून या आरक्षणावरील स्थगिती उठवण्याचा प्रयत्न करावेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांवर दोषारोप करून विषयांतर करू नये, असे खासदार उदयनराजे यांना राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी पत्रकाद्वारे प्रतिउत्तर दिले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









