प्रतिनिधी / इचलकरंजी :
इचलकरंजीतील आवळे गल्लीत सुरू असलेल्या तीन पानी जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. याप्रकरणी अड्डाचालक, दोन कामगारांसह १४ जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून १ लाख ३९ हजार ४९० रुपये रोख, ४ दुचाकी, एक चार चाकी गाडी व जुगाराचे साहित्य असा १३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने शनिवारी रात्री उशिरा केली. याबाबत पोलीस हेड कॉन्स्टेबल अर्जुन वसंतराव बंद्रे यांनी गावभाग पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









