प्रणय रॉय, राधिका रॉय यांच्या व्यवहारांना स्थगिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय प्रतिभूति आणि विनिमय बोर्डाने (सेबी) एनडीटीवीचे प्रवर्तक प्रणय रॉय आणि राधिका रॉय यांच्यावर दोन वर्षांसाठी बंदी घातली आहे. भेदिया (इनसाइडर ट्रेडिंग) व्यवसायात सहभागामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. सेबीने दोघांनाही 12 वर्षांपूर्वी अशाप्रकारच्या व्यवहारातून अवैध पद्धतीने कमाविण्यात आलेले 16.97 कोटी रुपये परत करण्यास सांगितले आहे.
बाजार नियामकाने याचबरोबर एक ते दोन वर्षांच्या कालावधीसाठी सेबीने सप्टेंबर 2006 ते जून 2008 दरम्यान कंपनीच्या समभागांमध्ये व्यवहारांची चौकशी केल्यावर हे पाऊल उचलले आहे.
6 टक्के व्याजासह परतफेड
संबंधित व्यक्ती आणि संस्थांना 17 एप्रिल 2008 पासून देयकाच्या मुदतीपर्यंत 6 टक्के व्याजासह ही रक्कम भरावी लागणार आहे. नवी दिल्ली टेलिविजन लिमिटेड मध्ये संवेदनशील माहिती प्राप्त करण्यास सक्षम पदांवर असताना प्रणय आणि राधिका रॉय यांनी इनसाइडर ट्रेडिंगमध्ये भाग घेत अवैध पद्धतीने 16.97 कोटी रुपयांहून अधिकची कमाई केल्याचे आढळून आले आहे.









