प्रतिनिधी / सातारा
महामार्गावर पडलेले खड्डे आणि टोल नाक्याकडून होत असलेली गैरसोय याबाबत आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी दि.18डिसेंबर 2019 ला आनेवाडी टोलनाक्यावर आंदोलन केले होते. त्याप्रकरणी भुईंज पोलीस ठाण्यात त्यावेळी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याप्रकरणी आज वाई न्यायालयात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही.एन.गिरवलकर यांच्यासमोर सुनावणी पार पडली.दोन्ही बाजूने म्हणणे ऐकून पुढील सुनावणी 9 रोजी होणार आहे.वाई न्यायालयात आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्यासह त्यांच्या समर्थकांच्यावतीने न्यायालयात बाजू ऍड.शिवराज धनवडे, ऍड.आर.डी. साळुंखे, ऍड.संग्राम मुंढेकर, ऍड.प्रसाद जोशी तर सरकार पक्षाच्यावतीने ऍड.मिलिंद पांडकर यांनी काम पाहिले.
महामार्गावर पडलेले खड्डे, टोल नाक्यावर होत असलेली गैरव्यवस्था यावरून आमदार शिवेंद्रसिंहराजे हे आक्रमक होऊन दि.18डिसेंबर 2019 रोजी आंदोलन केले होते. त्यावेळी जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू होता. भुईंज पोलीस ठाण्याचे पो. कॉ. धनाजी कदम यांनी जमावबंदी आदेशाचा भंग केल्याची फिर्याद दाखल केली होती. त्याप्रकरणी आज वाई न्यायालयात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, जितेंद्र सावंत, फिरोज पठाण, मिलिंद कदम,सर्जेराव सावंत, जयश्री गिरी, सरिता इंदलकर, विद्या देवरे, कांचन साळुंखे, जितेंद्र कदम, सुहास गिरी, धनंजय जांभळे, नासिर शेख, अशोक मोने, जयेंद्र चव्हाण, अविनाश कदम,अमोल मोहिते हजर झाले. दुपारी न्यायाधीश गिरवलकर यांच्यासमोर सुनावणी पार पडली. त्यांनी दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून दि.9डिसेंबर ही पुढची सुनावणी तारीख दिली आहे.









