प्रतिनिधी/ रत्नागिरी
गेल्या काही दिवसांपासून जिह्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढू लागल्यामुळे चिंता वाढू लागली आहे. प्रमुख पर्यटनस्थळ असलेल्या गणपतीपुळे येथे भेळविक्रेत्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आह़े या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आह़े दरम्यान, भेळविक्रेत्याच्या संपर्कात आलेल्यांची कोरोना चाचणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत़ गुरुवारी जिल्हय़ात नवे 23 कोरोनाबाधित रूग्ण सापडल्याने आरोग्य यंत्रणेच्या चिंतेत भर पडली आह़े
गुरुवारी जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून करण्यात आलेल्या कोरोना चाचण्यांमध्ये 23 रुग्ण पॉ†िझटिव्ह आढळून आले आहेत़ यामध्ये आरटीपीसीआर टेस्टमध्ये 7 तर ऍन्टिजेन टेस्टमध्ये 16 बाधित आढळून आले. यामध्ये रत्नागिरी तालुक्यात 12, संगमेश्वर 8, लांजा 2, चिपळूण येथे 1 नवा रुग्ण आढळून आला आह़े यामुळे जिह्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 8 हजार 733 इतकी झाली आह़े गुरुवारी बरे झालेल्या 24 रुग्णांना घरी सोडण्यात आल़े यामुळे कोरोनापासून बरे झालेल्यांची संख्या 8 हजार 233 वर पोहोचली आह़े जिह्यातील बरे होण्याचे प्रमाण 94.27 इतके आह़े









