प्रतिनिधी / खेड :
कोकण मार्गावर कोविड स्पेशल म्हणून धावणाऱ्या एर्नाकुलम – निजामुद्दीन मंगला एक्सप्रेस व तिरूअनंतपूरम – लोकमान्य टिळक टर्मिनस नेत्रावती एक्सप्रेस या दोन सुपरफास्ट गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार ३० नोव्हेंबरपासून या दोन्हीही गाडी सुधारित वेळापत्रकानुसार धावणार आहेत.
एर्नाकुलम – निजामुद्दीन मंगला एक्सप्रेस एर्नाकुलम येथून दुपारी १.२५ वाजता सुटून तिसऱ्या दिवशी दुपारी १.२५ वाजता निजामुद्दीनला पोहचेल. परतीच्या प्रवासात निजामुद्दीन येथून पहाटे ५.४० वाजता सुटून तिसऱ्या दिवशी सकाळी ७.३० वाजता एर्नाकुलमला पोहचेल. रत्नागिरी स्थानकात मंगला एक्सप्रेस पूर्वीच्या वेळेपेक्षा २५ मिनिटे आधी दाखल होणार आहे. पूर्वी ही गाडी दिल्लीच्या दिशेने जाताना सकाळी ७ वाजून ४० मिनिटांनी रत्नागिरी स्थानकात दाखल होत होती. ती आता सकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी येणार आहे.
तिरूअनंतपूरम – लोकमान्य टिळक टर्मिनस नेत्रावती एक्सप्रेस तिरुअनंतपुरम येथून सकाळी ९.१५ वाजता सुटुन दुसऱ्या दिवशी ४.४५ वाजला लो. टिळक टर्मिनसला पोहचेल. परतीच्या प्रवासात लो.टिळक टर्मिनस येथून सकाळी ११.४० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी ६.०५ वाजता तिरुअनंतपूरमला पोहचला. मुंबईच्या दिशेने जाताना ही गाडी कुडाळ सकाळी ६.२८ वाजता, रत्नागिरीला सकाळी ९ वाजता, चिपळूणला सकाळी १०.३८ वाजता तर खेडला सकाळी ११ वाजता दाखल होईल. कोकण मार्गावर या गाडीला कुडाळ, रत्नागिरी, चिपळूण, खेड आदी स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.









