बेंगळूर/प्रतिनिधी
राज्याचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या नेतृत्वात असणाऱ्या सरकारने कर्नाटक वीरशैव-लिंगायत विकास महामंडळासाठी (केव्हीएलडीसी) ५०० कोटी रुपये जाहीर केल्यानंतर सरकारने बी. एस. परमशिवैय्या यांना अध्यक्ष म्हणून नेमले. परमशिवैय्या सध्या कर्नाटक वीरशैव विद्याविश्वृधि समितीचे प्रमुख आहेत आणि ते विजयनगरातील रहिवासी आहेत.
दरम्यान, बाबू पट्टार यांना कर्नाटक विश्वकर्मा समुदाय विकास महामंडळाचे अध्यक्ष, रघु आर यांची मागासवर्गीय विकास महामंडळाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.
कर्नाटक अप्परा विकास महामंडळचे जी. के. गिरीश अप्पर आणि सविता समाज विकास महामंडळचे एस. नरेश कुमार हे नवीन प्रमुख असल्याची माहिती दिली आहे.









