बेंगळूर/प्रतिनिधी
शिवाजी नगरच्या बॉरिंग अँड लेडी कर्झन रुग्णालय परिसरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संशोधन केंद्र आता माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी या नावाने ओळखले जाणार आहे. या रुग्णालयाचे नाव अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व संशोधन केंद्र असे करण्यात आले आहे. या केंद्राची सुरुवात सन २०१८-१९ मध्ये करण्यात आली होती.
वैद्यकीय शिक्षण व आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. के. सुधाकर यांनी रविवारी ट्विट करुन ही माहिती दिली. त्यांनी स्वतः नाव बदलण्याची शिफारस केली होती. राज्य सरकारने हे मान्य करुन या संदर्भात आवश्यक आदेश जारी केले.
बॉरिंग आणि लेडी कर्झन हॉस्पिटल हे १२२ वर्ष जुने आहे आणि १९ व्या शतकाच्या शेवटीपासून ते ब्रिटिश राजवटीत विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण देत आहे. १८६८ मध्ये १०४ बेड्स ने या रुग्णालयाची सुरुवात झाली होती. म्हैसूरचे कमिशनर लेव्हिन बेंटन बॉरिंग यांनी त्यास बॉरिंग आणि लेडी कर्झन असे नाव दिले होते.