भारतात जानेवारी अखेरीस प्राप्त होणार : शेवटच्या टप्प्यातील निरीक्षणाकडे लक्ष
वृत्तसंस्था / लंडन, नवी दिल्ली
कोरोना विषाणूच्या संक्रमणापासून वाचण्यासाठी जगभरात कोरोनाच्या लसीवर वेगाने काम सुरू आहे. भारतात एक्स्ट्राजेनेका ही ऑक्सफर्ड-सीरमची लस जानेवारी महिन्याच्या अखेरीस भारतात उपलब्ध होण्याची चिन्हे आहेत. जगाच्या नजरा आता ऑक्सफर्डच्या एक्स्ट्राजेनेका लसीवर आहेत. ही लस 70 टक्क्यांपर्यंत प्रभावी ठरली असून चाचणीचे सर्व टप्पे पूर्ण होईपर्यंत 90 हून अधिक टक्के प्रभावी ठरू शकते, असा दावा वैद्यकीय तज्ञांकडून केला जात आहे. अमेरिका आणि ब्राझीलमध्ये करण्यात आलेल्या संशोधनानुसार ही माहिती देण्यात आली आहे.
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीकडून सोमवारी करण्यात आलेल्या विधानानुसार फेज 3च्या अंतिम विश्लेषणात 131 कोरोना केसचा समावेश करण्यात आला. यात दोन डोजिंग रेजिममध्ये ही लस 70.4 टक्क्मयांपर्यंत प्रभावी आढळली. दोन विविध डोस रेजिममध्ये याचे परीक्षण करण्यात आले. यात एक 90 टक्के प्रभावी होती तर दुसरी 62 टक्के प्रभावी होती. चाचणीअंतर्गत ही लस स्वयंसेवकांना देण्यात आलेल्यांपैकी कोणालाही रुग्णालयात दाखल करण्यात आलेले नाही. तसेच त्यापैकी कोणाचीही प्रकृती गंभीर नाही. एक्स्ट्राजेनेका या लसीचा वापर भारतासह जगभरातील लाखो लोकांवर होणार असून अद्याप तिसऱया टप्प्यातील चाचणीच्या निकालाची प्रतीक्षा केली जात आहे. आतापर्यंतच्या संशोधनानुसार ही लस प्रभावी मानली जात आहे. या लसीच्या माध्यमातून अनेक जीव वाचू शकतात, असे स्पष्टीकरण ऑक्सफर्डकडून करण्यात आले आहे.
जानेवारीच्या अखेरीस भारतात लस दाखल होणार
आगामी नवीन वर्षाच्या सुरुवातीला भारतासाठी कोरोनाच्या लसीसंबंधी दिलासादायक बातमी मिळणार आहे. जानेवारी महिन्याच्या शेवटपर्यंत देशात ऑक्सफर्डची लस उपलब्ध होण्याची शक्मयता आहे. या लसीची उपलब्धता सर्वप्रथम डॉक्टर्स, नर्स, पोलीस तसेच कोरोनासंबंधी काम करणाऱया कर्मचाऱयांना देण्यात येणार आहे. केंद्र सरकार पुण्यातील सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाला कोरोनाच्या लसीच्या वापरासंबंधी आपत्कालीन मंजुरी देण्याची शक्मयता आहे. सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया या डिसेंबरच्या अखेरपर्यंत केंद्र सरकारकडे आपत्कालीन मंजुरीसाठी अर्ज करण्याची शक्मयता आहे. कोरोनाच्या लसीच्या खरेदीसंबंधी केंद्र सरकार लस निर्मिती कंपन्यांशी अंतिम चर्चा करत असल्याचे समजते.
भारत बायोटेकच्या लसीलाही मंजुरी मिळण्याची शक्मयता
भारत बायोटेकनेही पहिल्या आणि दुसऱया टप्प्यातील लसीच्या चाचणीचे परीक्षण पूर्ण केले आहे. यामुळे भारत बायोटेकलाही लसीच्या आपत्कालीन चाचणीसाठी मंजुरी मिळण्याची शक्मयता आहे. कंपनीतर्फे आता तिसऱया टप्प्यातील चाचणीची माहिती प्रकाशित करण्यात येणार आहे. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर भारत बायोटेकची लस फेब्रुवारीपर्यंत बाजारात येईल, असे एका अधिकाऱयाने सांगितले.
सीरम इन्स्टिटय़ूटने ब्रिटनमध्ये त्यांच्या लसीच्या प्रभावासंबंधी माहिती जमा केल्यानंतर भारतात त्याच्या आपत्कालीन वापरासंबंधी विनंती केल्यास केंद्र सरकार त्याला मंजुरी देण्याची शक्मयता आहे. भारत बायोटेकच्या बाबतीतही केंद्र सरकार असा विचार करु शकते. असे घडले तर मार्च अखेरपर्यंत भारतात एकापेक्षा जास्त कोरोनाच्या लसींची उपलब्धता होण्याची शक्मयता आहे.
जानेवारीच्या अखेरीस भारतात लस दाखल होणार
आगामी नवीन वर्षाच्या सुरुवातीला भारतासाठी कोरोनाच्या लसीसंबंधी दिलासादायक बातमी मिळणार आहे. जानेवारी महिन्याच्या शेवटपर्यंत देशात ऑक्सफर्डची लस उपलब्ध होण्याची शक्मयता आहे. या लसीची उपलब्धता सर्वप्रथम डॉक्टर्स, नर्स, पोलीस तसेच कोरोनासंबंधी काम करणाऱया कर्मचाऱयांना देण्यात येणार आहे. केंद्र सरकार पुण्यातील सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाला कोरोनाच्या लसीच्या वापरासंबंधी आपत्कालीन मंजुरी देण्याची शक्मयता आहे. सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया या डिसेंबरच्या अखेरपर्यंत केंद्र सरकारकडे आपत्कालीन मंजुरीसाठी अर्ज करण्याची शक्मयता आहे. कोरोना लसीच्या खरेदीसंबंधी केंद्र सरकार लस निर्मिती कंपन्यांशी अंतिम चर्चा करत असल्याचे समजते.
भारत बायोटेकच्या लसीलाही मंजुरीची शक्मयता
भारत बायोटेकनेही पहिल्या आणि दुसऱया टप्प्यातील लसीच्या चाचणीचे परीक्षण पूर्ण केले आहे. यामुळे भारत बायोटेकलाही लसीच्या आपत्कालीन चाचणीसाठी मंजुरी मिळण्याची शक्मयता आहे. कंपनीतर्फे आता तिसऱया टप्प्यातील चाचणीची माहिती प्रकाशित होणार आहे. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर भारत बायोटेकची लस फेब्रुवारीपर्यंत बाजारात येईल, असे एका अधिकाऱयाने सांगितले.सीरम इन्स्टिटय़ूटने ब्रिटनमध्ये त्यांच्या लसीच्या प्रभावासंबंधी माहिती जमा केल्यानंतर भारतात त्याच्या आपत्कालीन वापरासंबंधी विनंती केल्यास केंद्र सरकार त्याला मंजुरी देण्याची शक्मयता आहे. भारत बायोटेकच्या बाबतीतही केंद्र सरकार असा विचार करू शकते. असे घडले तर मार्च अखेरपर्यंत भारतात एकापेक्षा जास्त कोरोनाच्या लसींची उपलब्धता होण्याची शक्मयता आहे.
भारतात अर्ध्या किमतीत मिळणार लस
ऑक्सफर्डच्या लसीची बाजारपेठेतील किंमत ही 500 ते 600 रुपये असण्याची शक्मयता आहे. भारतीय लोकसंख्या लक्षात घेता केंद्र सरकार या लसीची खरेदी मोठय़ा प्रमाणात करणार असल्याने सरकारला ही लस 225 ते 300 रुपयाला उपलब्ध होण्याची शक्मयता आहे. भारत सरकार सर्वसामान्यांना ही लस लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नात आहे. भविष्यात सार्वजनिक लसीकरण कार्यक्रमांतर्गत या लसीचे मोफत वाटपही होण्याची शक्मयता आहे.
शुभवार्ता…
- चाचणी सुरू असलेल्या रुग्णांपैकी एकावरही साईड इफेक्ट नाहीत
- जानेवारी महिन्याच्या अखेरीस लस उपलब्ध होण्याचे स्पष्ट संकेत









