प्रतिनिधी / रत्नागिरी
रत्नागिरी तालुक्यातील निवळी बाजारपेठ येथे कपड्याचे दुकान चोरट्यांनी फोडून 37 हजाराचा मुद्देमाल लंपास केल़ा ही घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास घडल़ी या प्रकरणी आकाश अनिल होरंबे (22, ऱा पानवल होरंबेवाडी) यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत तक्रार दाखल केली आह़े.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार यांच्या मालकीचे निवळी बाजारपेठ येथे फॅशन हब नावाचे कपड्यांचे दुकान आह़े. 21 नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी दुकानाच्या छपराचा पत्रा उचकटून त्यावाटे दुकानामध्ये पवेश केल़ा. यावेळी चोरट्यांनी आतील 37 हजार रूपयांचे कपडे चोरून नेल़े अशी तकार होरंबे यांनी ग्रामीण पोलिसांत केली आह़े. या घटनेचा पुढील तपास करण्यात येत आह़े.