प्रतिनिधी / लांजा
आजपासून शाळा सुरू झाल्या असून लांजा शहरातील शाळा सामाजिक न्याय सेल राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्यावतीने सॅनिटायजर करण्यात आल्या.
आजपासून शाळा सुरू होत असल्याने या पार्श्वभुमीवर विद्यार्थी व शिक्षकाच्या आरोग्याची काळजी म्हणून सकाळी शाळा सुरु होण्या आधीच लांजा शहरातील विद्यादिप विद्यालय व ज्यु. कॉलेज ही शाळांचे संपुर्ण सॅनिटायझेशन करण्यात आले. सामाजिक न्याय सेल राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टी लांजा यांच्यावतीने सॅनिटायजर करून देण्यात आली. राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टीचे प्रदेश चिटणीस अजित यशवंतराव यांच्या सहकार्याने व सामाजिक न्याय सेलचे प्रभारी तालुकाध्यक्ष दाजी गडहिरे यांनी स्वत: शाळाची संपुर्ण इमारत व वर्ग खोल्या सॅनिटायजर करून दिल्या व शाळेला पाच लिटर सॅनिटायजर देण्यात आले. यावेळी शाळेचे संस्थापक लाखण व काॅलेजचे मुख्याध्यापक अमोल जाधव यांनी आभार मानले.









