ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ट्विटर अकाऊंटने 1 मिलियन फॉलोअर्सचा टप्पा गाठला आहे. बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी ट्विटद्वारे यासंदर्भात माहिती दिली.
दास यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘RBI च्या ट्विटर अकाऊंटने आज 1 मिलियन फोलॉअर्सचा टप्पा गाठला आहे. RBI मधील आमच्या सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन.’
RBI ची दोन ट्विटर अकाऊंट आहेत. एका ट्विटर अकाऊंटद्वारे बँकेच्या महत्वाच्या धोरणांबाबत माहिती दिली जाते. तर दुसऱ्या अकाऊंटव्दारे लोकांमध्ये बँकिंग व्यवहारांबाबत जनजागृती करण्यात येते.









