प्रतिनिधी/ बेळगाव
रेप्को होम फायनान्सतर्फे शनिवारी हाऊसिंग लोन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. दिवाळीच्या उत्सवानिमित्त ग्राहकांना अवघ्या 7.75 टक्के इतक्मया कमी दराने गृहकर्ज उपलब्ध करून देण्यात आल्याने ग्राहकांचा या मेळाव्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला.
नेहरुनगर येथील आदित्य आर्केड येथील रेप्को होम फायनान्सच्या कार्यालयात हा मेळावा संपन्न झाला. शाखा व्यवस्थापक सुजय कोटगार यांनी आलेल्या ग्राहकांना गृहकर्जाविषयी माहिती दिली. लाभार्थींना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 2.67 लाखापर्यंत सबसीडी देण्यात येणार आहे. नवीन घराचे बांधकाम, नवे घर, फ्लॅट, प्लॉट यांची खरेदी, त्यांची दुरुस्ती, व्यावसायिक इमारत व शॉप, ग्रामीण हाऊसिंग फायनान्स यासाठी कर्ज पुरवठा करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. शनिवारी गृहकर्जाच्या चौकशीसाठी नागरिक कार्यालयात दाखल होत होते. कर्जपुरवठा कसा केला जाईल, याविषयीची माहिती मेळाव्यात देण्यात आली. यावेळी ग्राहक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.









