ऑनलाईन टीम / विक्टोरिया :
भारतातून आलेल्या प्रवाशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळल्याने हॉंगकॉंग विमानतळ प्राधिकरणाने एअर इंडियाच्या विमानांवर पाचव्यांदा बंदी घातली आहे. ही बंदी 14 दिवसांसाठी असणार आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हॉंगकॉंग विमानतळ प्राधिकरणाने जुलैमध्ये घालून दिलेल्या नियमांप्रमाणे भारत ते हॉंगकॉंग प्रवास करणाऱ्या प्रवाशांची 72 तासातील कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह असणे आवश्यक आहे. मात्र, तरी देखील भारतातून येणाऱ्या प्रवाशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळल्याने यापूर्वी एअर इंडियाच्या विमानांवर 4 वेळा बंदी घालण्यात आली होती.
दिल्ली-हाँगकाँग विमानांवर 20 सप्टेंबर, 18 ऑगस्ट, 17 ऑक्टोबर आणि चौथ्यांदा 10 नोव्हेंबरपर्यंत आणि पाचव्यांदा 20 नोव्हेंबर ते 3 डिसेंबरपर्यंत बंदी घालण्यात आली आहे.