ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
डोनाल्ड ट्रम्प यांचे पुत्र ज्युनिअर डोनाल्ड ट्रम्प यांना आठवड्याच्या सुरुवातीला कोरोनाची बाधा झाली आहे. ते सध्या घरातच क्वारंटाईन आहेत. त्यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळली नाहीत.
यापूर्वी ज्युनिअर यांचे वडील डोनाल्ड ट्रम्प, आई मेलानिया आणि त्यांचा लहान भाऊ बॅरॉन यांना यापूर्वी कोरोनाची लागण झाली होती.
दरम्यान, अमेरिकेत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना रुग्णसंख्येत अमेरिकेचा जगात पहिला क्रमांक लागतो. अमेरिकेत आतापर्यंत 1 कोटी 22 लाख 74 हजार 726 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 73 लाख 17 हजार 731 रुग्ण बरे झाले असून, 46 लाख 98 हजार 981 रुग्ण उपचार घेत आहेत. तर 2 लाख 60 हजार 283 जणांचा मृत्यू झाला आहे.









