बेंगळूर/प्रतिनिधी
कॉंग्रेसचे माजी महापौर संपतराज यांना शुक्रवारी बेंगळूर कोर्टाने १४ दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे सह पोलीस आयुक्त संदीप पाटील यांनी दिली.
बेंगळूर शहर पोलिसांच्या केंद्रीय गुन्हे शाखेने (सीसीबी) सोमवारी रात्री राज यांना अटक केली. सोशल मीडियावर एक अपमानास्पद पोस्ट टाकल्यानंतर शहरातील काही भागात हिंसाचार भडकला. या हिंसाचारात त्यांचा सहभाग असल्याच्या आरोपावरून त्यांना अटक केली आहे.
संपतराज यांना सुरुवातीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. शुक्रवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडीचे आदेश दिले. ११ ऑगस्ट रोजी कावळ बायरसंद्र येथे कॉंग्रेसचे आमदार अखंड श्रीनिवास मुर्ती यांच्या निवासस्थानावर जाळपोळ करण्यात आलेल्या हिंसक घटनेत त्यांच्या भूमिकेविषयी महत्त्वपूर्ण माहिती गोळा करण्यात आल्याचे तपास पथकाने म्हटले आहे.









