जेष्ठ नेते अण्णा डांगे मार्गदर्शन करणार, आरक्षणासह महत्त्वाचे निर्णय शक्य
प्रतिनिधी/इस्लामपूर
महाराष्ट्र धनगर समाज महासंघाच्यावतीने बुधवार दि. २ डिसेंबर रोजी सकाळी ११:०० वाजता धुळे येथील संतोषीमाता चौक, शिवतिर्थ नजीक सैनिक लॉच धुळे, येथे महाराष्ट्रराज्य कार्यकारीणी, उच्च स्तरीय समन्वय समिती, राज्यातील सर्व विभाग प्रमुख, मल्हारसेना, अहिल्या महिला संघ, कर्मचारी संघटना, या आघाड्यांचे सर्व प्रदेश पदाधिकारी तसेच सर्व आघाड्यांचे जिल्हा अध्यक्ष, उपाध्यक्ष व सरचिटणीस यांची आरक्षणासह समाजाच्या अन्य महत्वपूर्ण प्रश्नांवर तसेच आगामी धोरणात्मक नियोजना संदर्भात राज्यव्यापी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष आमदार रामहरी रूपनवर, मल्हारसेना सरसेनापती बबनरावजी रानगे , अहिल्या महिला संघाच्या प्रदेशाध्यक्षा पुष्पाताई गुलवाडे, कर्मचारी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संभाजीराव बैखरे, आमदार पोपटराव गावडे ,आमदार नायरायणआबा पाटील , आमदार रामरावजी वडकुते , चंद्रकांत देशमुख तसेच महासंघाचे महामंत्री सुभाषभाऊ सोनवणे, सुनिलभाऊ वाघ, पांडूरंग काकडे, मा . डॉ . अलकाताई गोडे, श्रीरामभाऊ पुंडे, मा . साहेबराव चिडवाघ, मा , संदीप तेले , मा . संतोष धनगर , वासुदेवराव आसकर, उमेशभाऊ घुरडे, युवराज घोडे, मा . नंदाताई शेळके, नानासाहेब गाडेकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत .
Previous Articleप्रशासन, यात्रेचे मानकरी यांच्या संयुक्त बैठकीतून घेणार सिद्धेश्वर यात्रेचा निर्णय : आयुक्त
Next Article `पदवीधर’ निवडणुकीला उच्च न्यायालयाकडून स्थगिती शक्य








