यात्रा रद्द करण्याबाबतचा कोणताही प्रस्ताव शासनाकडे पाठवला नाही
तरुण भारत संवाद प्रतिनिधी/सोलापूर
कोरोना प्रादुर्भावाच्या दुसऱ्या लाटेचे संकेत पहाता जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, यात्रेचे मानकरी यांच्याशी चर्चा करून यंदाच्या सिद्धेश्वर यात्रेचे नियोजन करण्यात येणार आहे असल्याची माहिती मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी आज, शुक्रवारी दिली.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता जिल्हा प्रशासनाने योग्य असे निर्बंध घातले होते. याच पार्श्वभूमीवर मागील काही महिन्यांपासून सार्वजनिक उत्सवावर देखील बंदी घालण्यात आली होती. याचाच एक भाग म्हणून सार्वजनिक गणेशोत्सव, नवरात्र उत्सव आणि आषाढी एकादशी सारख्या यात्रेवर देखील बंदी घालण्यात आली होती. परंतू 8 महिन्याच्या प्रदीर्घ कालावधीनंतर कोरोना आटोक्यात आलेला असतानाच शासनाकडून कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या अनुषंगाने जानेवारी महिन्यात होणाऱ्या सिद्धेश्वर यात्रेच्या संदर्भात जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त यांच्याशी सखोल अशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी प्रतिक्रिया आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.
तसा कोणताही प्रस्ताव नाही
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून आलेल्या निर्देशानुसार योग्य असे नियोजन केले जाणार आहे. तत्पूर्वी पोलीस आयुक्त महापालिका प्रशासन आणि यात्रेचे मानकरी यांच्यात संयुक्त बैठक घेऊन अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. तथापि शासनाकडे यात्रा रद्द करण्याबाबतचा असा कोणताही प्रस्ताव आम्ही पाठवलेला नाही. –पी. शिवशंकर, आयुक्त, सोलापूर महानगरपालिका
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









