सातारा/प्रतिनिधी
येथील मंगळवार पेठेत रात्री 12 वाजण्याच्या नंतर ते पहाटे चार वाजण्याच्या दरम्यान रोहित झोरे या मनोरूग्ण तरुणाने पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या सात गाड्या फोडल्याने खळबळ उडाली. त्याला सकाळी शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. आज सकाळी उठल्यावर मंगळवार पेठेतल्या नागरिकांना रोहित झोरे हा गाड्या फोडत असल्याचे दिसल्याने त्याची माहिती पोलिसांना कळवली.









