चार चाकीसह विविध कंपनीचा गुटखा, सुगंधी तंबाखू असा लाखोचा मुद्देमाल जप्त
प्रतिनिधी / इचलकरंजी
पेठवडगाव येथील गुटखा तस्कर व्यापाराला गुरुवारी पहाटेच्या सुमारास पोलिसांनी रंगेहाथ पकडले. अमोल अरुण लोळगे ( वय ४० , रा . पदमा रोड , वाणी पेठ , पेठवडगाव , ता . हातकणंगले ) असे त्या गुटखा तस्कराचे नाव आहे.
त्यांच्याकडून एक चारचाकी गाडी आणि लाखो रुपयांचा विविध कंपनीचा गुटखा असा लाखो रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई इचलकरंजीमधील लिंबू चौक ते शेळके मळा रस्त्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने केली.









