ऑनलाईन टीम / भोपाळ :
गाय संरक्षणासाठी मध्यप्रदेश सरकार ‘गो कॅबिनेट’ची स्थापना करणार आहे. त्यासाठी 22 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता गौ अभयारण्य सालरिया आग्रा मालवा येथे पहिली बैठक होणार आहे. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी यासंदर्भात ट्विटद्वारे माहिती दिली आहे.
गो कॅबिनेटमध्ये पशुपालन, वन,पंचायत आणि ग्रामीण विकास, अर्थ, गृह आणि शेतकरी कल्याण विभागाचाही सहभाग असणार आहे. गाईंच्या संरक्षणासाठी हे सर्व विभाग एकत्रितरित्या चर्चा करणार आहेत.
गाईंच्या संरक्षण आणि प्रजजनाची जबाबदारी पशुपालन विभागाकडेच असेल. संरक्षण आणि इतर जबाबदारी गृह आणि वन विभागाकडे सोपविण्यात येणार आहे.