बेंगळूर
पुढील वषी जूनपर्यंत 50 ते 60 लाख जणांना रोजगार उपलब्ध करण्याची योजना केंद्र सरकारने आखली आहे. आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेअंतर्गत भारतातील उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
कोरोना महामारीच्या काळात व्यवसाय उद्योगांना मोठा फटका बसला आहे. अनेकांच्या वेतनामध्ये कपात करण्यात आली आहे तर अनेकांना कामावरून कमी करण्यात आले आहे. कोरोना काळामध्ये सुमारे 2 लाख जणांनी रोजगार गमावल्याची माहिती ईपीएफओच्या माहितीमधून समोर आली आहे. हे लक्षात घेता आत्मनिर्भर भारत रोजगार योजना प्रभावीपणे राबवून योग्य पात्र उमेदवारांना नोकरीच्या संधी उपलब्ध केल्या जाणार आहेत. जून 2021 पर्यंत 50 ते 60 लाख जणांना नोकऱया उपलब्ध करून दिल्या जातील, असे सरकारने म्हटले आहे. त्याची कार्ययोजना आखली जात असल्याचेही सरकारकडून स्पष्ट करण्यात आले.









