वृत्तसंस्था/ बगदाद
इराकच्या राष्ट्रीय ऑलिंपिक समिती प्रमुखपदी सर्माद अबदेल्ला यांची निवड करण्यात आली. अबदेल्ला हे इाराक ऑलिंपिक समितीचे माजी खजिनदार होते.
2021 साली होणाऱया टोकियो ऑलिंपिक स्पर्धेतील इराकच्या सहभागाविषयी साशंकता निर्माण झाली होती. इराकची ऑलिंपिक समिती यापूर्वी तहकूब करण्यात आल्याने या समितीचा कारभार आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या देखरेखखाली चालू होता. 46 वर्षीय अबदेल्ला यांची शनिवारी झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अबदेल्लाना 19 तर माजी अध्यक्ष राद हमोदी यांना 17 मते मिळाली.









